अमरावती जिल्हा बँक निवडणूक : मतदानाला सुरुवात, दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

yashomati thakur bachhu kadu
yashomati thakur bachhu kaduyashomati thakur bachhu kadu
Updated on

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (amravati district cooperative bank election) बहुप्रतिक्षीत मतदानाला सकाळी आठ वाजतापासून सुरुवात झाली. १७ संचालकपदांसाठी ४८ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळातील यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू या दोन मंत्र्यांनी एकमेकांच्या विरोधात पॅनल उभारले आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

yashomati thakur bachhu kadu
अमरावतीत दोन मंत्री आमने-सामने, यशोमती ठाकूरही दाखल करणार अर्ज

अमरावती तसेच भातकुली तालुक्याचे मतदान अमरावती येथील शासकीय गर्ल्स हायस्कूल येथे होत आहे. १३४ तालुक्यांच्या ठिकाणी मतदानकेंद्रांवर सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे बँकेच्या मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांसह अन्य राजकीय आणि सहकारातील दिग्गजांचा त्या पॅनलमध्ये प्रत्यक्ष उमेदवार म्हणून सहभाग आहे. तर त्यांच्याविरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल आहे. परिवर्तन पॅनलमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत संजय खोडके, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह सहकारातील दिग्गज मंडळी उमेदवार आहेत. तर भाजप आमदार प्रताप अडसड, माजी मंत्री भैय्यासाहेब देशमुख सारखे दिगग्ज पॅनलचं काम पाहत आहेत. मंत्र्याच्या आणि आमदारांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक हायव्होल्टेज झाली आहे. मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com