
चंद्रपूर : ''जीपीएस टॅग'' लावण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ''ताडोबा व्याघ्र प्रकल्पा''तून सोडण्यात आलेल्या एका गिधाडाने तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला आहे.