समुद्रपूर (जि. वर्धा) : समुद्रपूर तालुक्यातील भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त वायगाव हळदीची कीर्ती आता देशाबाहेर पोहोचली आहे..एक्झिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या निर्यात-प्रमोशन मोहिमेअंतर्गत, केनियातील आंतरराष्ट्रीय खरेदीदार पेरिस यांनी रविवारी (ता. दोन) वायगाव हळद उत्पादक कंपनीला भेट दिली. वायगावच्या हळदीचे बहुगुण पाहून त्या प्रभावित झाल्या..भेटीदरम्यान कृषोन्नती शेतकरी उत्पादक कंपनी, वायगाव येथे संचालक आणि शेतकऱ्यांसोबत हळदीच्या उत्पादन, प्रक्रिया व निर्यातीबाबत चर्चा झाली. आयातदारांनी हळदीच्या औषधी गुणधर्मांविषयी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची मागणी याबाबत विशेष रस दर्शविला. त्यांनी किशोर घुमडे यांच्या हळद लागवडीची आणि प्रक्रिया उद्योगासाठी असलेल्या गोदामाची पाहणी केली..कंपनीचे संचालक पितांबर घुमडे, नीतेश थूल, आशीष ठाकरे, जयश्री दिने, सचिन चतुर यांनी हळद प्रक्रियेतील कामकाज व स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग याची माहिती दिली. या भेटीदरम्यान आत्माच्या प्रकल्प संचालक नलिनी भोयर यांनी वायगाव हळदीचे आरोग्यवर्धक गुण, भौगोलिक मानांकनाचे महत्त्व आणि निर्यात क्षमता याबाबत माहिती दिली..500 रुपयांच्या आत 'ग्रीन गिफ्टिंग'! नेहा जोशी-नातूने पर्यावरणपूरक वस्तूंमधून १२ वर्षांपूर्वी कशी उभारली स्टार्टअप कंपनी?.कार्यक्रमाला स्मार्ट नोडल अधिकारी रोहन झंझारे, उपविभागीय कृषी अधिकारी स्वप्नील तोरणे, श्रीमती बारेकर, तालुका कृषी अधिकारी हर्षदा खेकारे, सचिन सुतार, सचिन वाळके, अनिकेत भुसंगे, राजेश चांदेवार, सुधीर हिवसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रवीण वानखडे भेटीसाठी सहकार्य केले..गुणवत्तेची दखलवायगाव हळदीच्या गुणवत्तेची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असून, येत्या काळात वायगावची हळद परदेशात निर्याती करण्यासाठीचे नवे मार्ग खुले होण्याची आशा शेतकरीवर्गात व्यक्त केली जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.