
अमित मेश्राम
तुमसर : तुमसर तालुक्याची जीवनदायिनी व भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी सध्या गंभीर संकटातून जात आहे. तुमसर तालुक्यात अनेक ठिकाणी नदीच्या काठांचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असल्याने शेकडो हेक्टर सुपीक जमीन नदीपात्रात समाविष्ट होत आहे.