esakal | वाडीत "डेंगी' प्रतिबंधासाठी कसली कंबर 
sakal

बोलून बातमी शोधा

वाडी ःडेंगी प्रतिबंधासाठी साफसफाई करताना नगरपरिषदेचे कर्मचारी.

वाडीत "डेंगी' प्रतिबंधासाठी कसली कंबर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडी (जि.नागपूर) : नवनियुक्त अध्यक्ष राजेश थोराणे व मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात वाडी परिसरात स्वच्छता मोहीम व डेंग्यू आजार थांबविण्यासाठी नियोजन करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 
मागील 2 वर्षांपासून परिसरात डेंगीच्या प्रसाराने नागरिक व आरोग्य विभागाला मोठया समस्येचा सामना करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने मागील एक महिन्यापासून आधीच याबाबत जनजागृती सुरू केली. वाडीतील काही भागात डेंगी आजाराची कुणकूण लागताच परिसरातील सर्वच रुग्णालय संचालकांना याबाबत सूचनापत्र पाठवून दररोजचा अहवाल मागविला आहे. आरोग्य विभागाने अनेक भागाचे सर्वेक्षण करून औषधींची फवारणी सुरु केली आहे. यासाठी 50 आशावर्कर डेंगी प्रतिबंधक मदत व उपचार कार्यात व्यस्त आहेत. 10 स्प्रे पंपच्या साहाय्याने औषधी, डी.डी.टी., धूर फवारणी, साचलेल्या पाण्याची निकासी आदी कामे आरोग्य कर्मचा-यांद्वारे दररोज करण्यात येत आहेत. आता तर व्यावसायिक परिसरात रात्रीच्या वेळी सफाई आरंभ करण्यात आली आहे. स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत 100 टक्‍के ओला-सुखा कचरा घराघरातून वाहनांद्वारे संकलित करून जवाहरनगर प्लांटवर त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या या कार्यवाहीने लवकरच वाडी कचरामुक्त शहर होईल, असा विश्वास न.प.ने व्यक्त केला.  स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले ने शनिवारी आपले सहयोगी आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे, रोहित शेलारे सह वाडी परिसरातील विभिन्न नगरात व व्यावसायिक परिसराचे निरिक्षण करुन माहिती घेतली. 

loading image
go to top