प्रतीक्षा! गावे कधी होणार "पाणीदार'?

मनोज खुटाटे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

जलालखेडा (जि. नागपूर) :  2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाणीटंचाईमुक्त करून सर्वांसाठी पाणी या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारने सुरू केले. पण, नरखेड तालुक्‍यात शेकडो सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, लहान मोठे सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा त्यांची दुरवस्था असल्यामुळे नरखेड तालुका आजही तहानलेलाच आहे. यामुळे नरखेड तालुक्‍यातील जलयुक्त शिवार गावे कधी होणार "पाणीदार'? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जलयुक्त शिवार योजनेमधून सिमेंट प्लग बंधारे, कोल्हापुरी बंधारे यांचे खोलीकरण करून त्यामध्ये पाणी अडविले जात नसल्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले बंधारे कोरडेच राहत आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होताना दिसत नाही. तसेच तालुक्‍यातील धरणे गाळाने भरलेली आहेत. तालुक्‍यातील लहान मोठे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले नाहीत. अपुऱ्या व अनियमित पडणाऱ्या पावसामुळे नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सतत सामना करावा लागत आहे. या टंचाई परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊन पीक उत्पन्नात घट होऊ लागली आहे.
नरखेड तालुका संत्रा व मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून या वर्षी भीषण दुष्काळामध्ये संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी बागा वाचविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. तरीहीसुद्धा फळ उत्पादकांची लाखो संत्रा झाडे वाळली. यात कोट्यवधींचे नुकसान झाले. शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या भेडसावत असल्याने या सर्वांवर ठोस उपाययोजनेची गरज निर्माण झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wait! When will the villages be water?