

Vidarbha News
esakal
वणी: जागतिक पृथ्वी दिन २२ एप्रिलच्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातील जुगाद आणि आपटी परिसरात अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भूशास्त्र व पुरातत्व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केलेल्या संशोधनातून हत्ती, बायसन, हरिण, डुक्कर यासारख्या प्राण्यांचे जीवाश्म तसेच काही मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारे आढळली आहेत.