esakal | प्रेरणादायी... तब्बल सातव्या प्रयत्नात मिळविले हे घवघवीत यश, आता होतोय कौतुकाचा वर्षाव...
sakal

बोलून बातमी शोधा

Wani's Abhinav Ingole achieves UPSC success

वडील शिक्षक असल्याने घरात सुरूवातीपासूनच शैक्षणिक वातावरण होते. त्यात मोठा अधिकारी व्हायचे ही जिद्द अभिनवच्या मनात होती. प्राथमिक शिक्षण त्याने वणी येथील विवेकानंद विद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता दहावीमध्ये गुणवत्ता यादीत झळकला होता.

प्रेरणादायी... तब्बल सातव्या प्रयत्नात मिळविले हे घवघवीत यश, आता होतोय कौतुकाचा वर्षाव...

sakal_logo
By
तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे़', ही म्हण अगदी सार्थ ठरवली आहे वणीच्या अभिनवने. माणसाने एखादी गोष्ट मनाशी ठरवली की ती जिद्दी व चिकाटीने प्राप्त करता येते. नोकरी करून यूपीएससीची तयारी करणाऱ्या अभिनव प्रवीण इंगोलेने सिद्ध करून दाखवित या परीक्षेत त्याने यश प्राप्त केले आहे.

वडील शिक्षक असल्याने घरात सुरूवातीपासूनच शैक्षणिक वातावरण होते. त्यात मोठा अधिकारी व्हायचे ही जिद्द अभिनवच्या मनात होती. प्राथमिक शिक्षण त्याने वणी येथील विवेकानंद विद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता दहावीमध्ये गुणवत्ता यादीत झळकला होता. मराठी या विषयात महाराष्ट्रात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने ग. दि. माडगुळकर पुरस्कार मिळाला होता. बारावीनंतर सांगली येथून इंजिनिअरिंग पदवी मिळवली.

हेही वाचा - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...
 

मात्र, व्हायचे तर मोठा अधिकारी ही जिद्द मनात ठेवून त्याने युपीएससीची तयारी सुरू केली. सात वेळा त्याने प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. परंतु, त्याने जिद्द सोडली नाही अभ्यास सुरूच ठेवला मुंबई येथे सेक्युरिटी एक्सचे बोर्ड ऑफ इंडिया येथे नोकरी स्वीकारली. नोकरी करीत असतांना त्याच जोमाने तयारी सुरू ठेवली व आज जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात ओबीसी प्रवर्गातून 624 वी रॅक प्राप्त केली. अभिनवची बहीण अंकिता आयुर्वेदामध्ये पीएचडी करीत आहे. तर वडील प्रवीण इंगोले सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आई प्राची इंगोले गृहिणी आहे. त्याने प्राप्त केलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
 

ग्रामीण भागातून  दुसऱ्यांदा सर केला गड


वणी शिरपूरसारख्या गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याऱ्या सुमित रामटेके याने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त करून ग्रामीण ग्रामीण भागातील मुलेदेखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात, हे दाखवून दिले. वणी तालुक्यातील शिरपूर हे गाव या गावातील सुमित सुधाकर रामटेके याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. सुमितच्या घरची परिस्थिती तशी हलाकीची. वडील सुधाकर शिरपूर येथील गुरुदेव विद्यालात परिचारक म्हणून कामाला होते. सुमितने शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण केले. त्यानंतर त्याने पुढील शिक्षणाकरिता वणी गाठली व जनता विद्यालात प्रवेश घेतला. बारावीनंतर त्याने आयआयटी वाराणसी येथून बीटेकची पदवी प्राप्त केली. एका कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र सुमितला प्रशासकीय सेवेत जायचं होतं त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षेची नागपूर येथे तयारी सुरू केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्याला यश आले. सुमितने अनुसूचित जाती या प्रवर्गातून 748 रॅक प्राप्त केली.  त्याच्या यशात त्याची आई ज्योत्स्ना रामटेके हिचा मोठा वाटा असल्‍याचे सुमित सांगतो.

निखिल दुबेला 733 रँक


केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या निकालात नागपूरच्या जुने मॉरिस कॉलेज येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील निखिल दुबे याने 733 रँक मिळविला आहे. या केंद्रातील सहा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करणारा पुण्याचा प्रसाद शिंदे (२८७), नाशिकचा आशीष कांबळे (६५१), चंद्रपूरची प्रज्ञा खंडारे (७१९), नागपूरचा निखिल दुबे (733), चंद्रपूरचा सुमित रामटेके (७४८), स्वरूप दीक्षित (८२७) यांनी यूपाएससी परीक्षेत बाजी मारली. निखील दुबे याने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. यापार्वी २०१८ मध्ये यूपाएससीत यश मिळवित इंडियन इन्फर्मेशन सर्व्हीसमध्ये सहायक संचालकपदी नियुक्ती मिळविली. २०१८ पासून तो या पदावर दिल्लीत कार्यरत आहे. अभियांत्रिकी पदवीनंतर एमबीए करणाऱ्या निखीलचे वडील मत्स्य विभागाचे सहायक आयुक्तपदावरून नियुक्त झाले आहेत. त्याचे मावस भाऊ अभिन व राजेश मोडक यांनी यापूर्वी यूपीएससीत बाजी मारली आहे. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनात निखिलनेही २०१४ पासून यूपीएससीचा अभ्यास आणि तयारी सुरू केली. 


संपादन : अतुल मांगे