श्रेयाच्या निखाऱ्यावर पुन्हा फुकंर; मंदिराच्या सौंदर्यीकरणावरून आमदारांत ‘वार’

War among MLAs over beautification of temple in Chandrapur
War among MLAs over beautification of temple in Chandrapur

चंद्रपूर : स्थानिक आमदार किशोर जोरगेवार आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातील ‘सख्य’ जगजाहीर आहे. आता महाकाली मंदिर देवस्थान परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या मुद्‌द्यावर पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. जोरगेवार यांनी महाकाली मंदिरात विकास आराखडा सादर केला. त्यापूर्वीच मुनगंटीवारांनी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीसाठी दिल्लीत बैठक लावणार असल्याचे जाहीर केली. या दोघांमध्ये विकांसकामांच्या श्रेयावरून यापूर्वीसुद्धा धुसफूस झाली आहे. मध्यंतरीच्या काळात शांत झालेल्या श्रेय वादाच्या निखाऱ्यावर महाकाली मंदिराच्या निमित्ताने दोन्हीकडून फुंकर घातली जात आहे.

भाजपमध्ये असताना जोरगेवार मुनगंटीवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, कालांतराने जोरगेवार यांनी वेगळी वाट निवडली. अपक्ष आमदार म्हणून ते चंद्रपुरातून निवडून आले. या निवडणुकीतील प्रचारात भाजप आणि जोरगेवार समर्थकांकडून खालची पातळी गाठली. तेव्हापासून या दोघांमध्ये तीव्र मनभेद झाले.

सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असताना कोट्यवधींची विकासकामे त्यांनी जिल्ह्यात मंजूर केली होती. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकामांच्या लोकापर्णावरून जोरगेवार यांनी अनेकदा आक्षेप घेतले. दरम्यानच्या काळात १९ सप्टेंबर २०१९  रोजी महाकाली मंदिर देवस्थान परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी ५१ कोटी १५ लाख पंचवीस हजारांचा निधी मंजूर झाला. स्थापत्य अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्राप्त आहे. या मंजूर निधीवरून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांना त्यावेळी दावे प्रतिदावे केले होते. आता महाकालीच्या मुद्यावर पुन्हा समोरासमोर आले.

जोरगेवार यांनी २१ मार्चला बांधकाम विकास आराखडा सादर केला. त्याच्या आदल्याच दिवशी मुनगंटीवार यांनी प्रसिद्धी पत्रक काढले. त्यात महाकाली मंदिराच्या विकासासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या परवानगीसाठी केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यासोबत बैठक घेणार, असे जाहीर केले. आगामी महानगर पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाकालीच्या विकासाचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com