वर्धा/नागपूर - हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील विदर्भ विभागात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले असून ग्रामीण भागातील नागरिक उष्णतेच्या झळा सोसत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा अभ्यास केला असता घरातील तापमान, घराची रचना आणि पर्यावरणीय घटकांचा आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.