

Wardha Crime
sakal
वर्धा : बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षीय तरुणीला प्रेमसंबंध ठेवण्यास गळ घातली. तिने नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून कथित प्रियकराने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. सावंगी (मेघे) परिसरात बुधवारी (ता. पाच) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रोशन नारायण वावधने (वय २४) रा. वाघ सावली असे मारेकऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.