

Food safety inspection at Goras Bhandar in Wardha.
esakal
वर्धा, : गोरस भंडारमधील अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघन प्रकरणात वेळेत कारवाई न केल्याचा ठपका ठेवत अन्न व औषध प्रशासनाचे वर्धा येथील सहायक आयुक्त (अन्न) प्र. भा. टोपले यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.