पशुपक्षी वनात केला दीपोत्सव साजरा; वनविभाग व पीपल फॉर ऍनिमल्सचा उपक्रम

रुपेश खैरी
Wednesday, 18 November 2020

प्राण्यांची व पक्ष्यांच्या तब्येतीची स्वतः विचारणा करत व करुणाश्रमाचे इतर व्यवस्थापन तसेच करुणाश्रमात अहोरात्र झटणारे करुणाश्रमातील चमूस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत वर्धा वनविभागाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी भेट दिली.

वर्धा : जिल्ह्यातील केंद्र शासन मान्यता प्राप्त असलेले करुणाश्रम वन्यप्राणी बचाव केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करून वेळोवेळी वनात सोडण्यात येतात. अशाच प्रकारे गत एका महिन्यात वनविभागाच्या जलद बचाव गटाच्या कर्मचाऱ्यांना उपचाराअंती बरे झालेल्या पशुपक्षी आणि प्राण्यांना जंगलात मुक्‍त केले.

प्राण्यांची व पक्ष्यांच्या तब्येतीची स्वतः विचारणा करत व करुणाश्रमाचे इतर व्यवस्थापन तसेच करुणाश्रमात अहोरात्र झटणारे करुणाश्रमातील चमूस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत वर्धा वनविभागाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत सदर वन्यप्राण्यांना व पक्ष्यांना जंगलात मुक्त केले. गत २० वर्षांपासून पीपल फॉर ऍनिमल्स वन्यप्राण्यांच्या संवर्धन व संरक्षणाकरिता करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपवनसंरक्षकांनी यांनी सर्वांचे कौतुक केले.

10 प्राण्यांची झाली सुटका

आपत्कालीन परिस्थिती ज्यामध्ये नायलॉन मांजामुळे जखमी झालेले, रस्त्यावर जखमी झालेले, विषबाधा झालेले, छोटे पिल्लं मोठे करून वाढवलेल्या प्राणी व पक्ष्यांचा समावेश यात होता. सदर पशुपक्ष्यांना करुणाश्रमात उपचारार्थ दखल करण्यात आले होते. विविध प्रकारचे पाच पक्षी यात पांढऱ्या मानेचा करकोचा, कंकर, कापशी घार, बगळे, दोन अजगर साप, धामण, माकड अशा एकूण 10 प्राण्यांचा समावेश होता.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Wardha Forest Department and People for Animals have celebrated Dipotsav in the forest