

Wardha News
esakal
वर्धा: एप्रिल महिना उजाडताच आंब्याच्या सुगंधाने दरवळणारा ग्रामीण परिसर ही कधीकाळी वर्धा जिल्ह्याची ओळख होती. गावोगावी, शेताशेतांमध्ये उभ्या असलेल्या दाट आमराया आणि उन्हाळ्यात त्यांच्या सावलीत विसावणारे शेतकरी, कैऱ्यांच्या गंधाने भरलेली दुपार आणि पिकलेल्या आंब्यांची गोडी हे सर्व चित्र आता भूतकाळात जमा झाले आहे. कारण, सध्या वर्धा जिल्ह्यात पारंपरिक गावरान आमराया जवळपास पूर्णपणे नामशेष झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.