वर्धा: वर्धा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून तापमान ४५ अंशाच्या जवळ पोहोचले आहे. त्याचा फटक जिल्ह्यातून जात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वरील वाहतुकीलाही बसला आहे..तळपत्या उन्हात या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवास टाळल्या जात आहे. गत महिनाभरात या मार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे चित्र आहे..अटकेच्या दिवशीच खरातची जमीन खरेदी, पत्नी फरार असताना तिच्या नावे व्यवहार पूर्ण; महसूल विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह.वाढत्या तापमानात सिमेंटच्या रस्त्यावर तापमान अधिक जाणवत असल्याचे काही चालकांकडून सांगण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या रस्त्यावर धावताना उष्णतेमुळे वाहनांचे टायर निकामी होऊन अपघाताची शक्यता बळावत आहे. वाहनांना आग लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत..परिणामी, या रस्त्याने धावणारे अनेक वाहनचालक दिवसाचा प्रवास टाळू लागले आहेत. या रस्त्यावर कुठेही मोठी झाडे नसल्याने मालवाहतूक करणारी अनेक वाहने दिवसभर पेट्रोल पंपांवर उभी राहत असल्याचे वास्तव आहे. ती वाहने सायंकाळी सहा वाजल्यानंतरच प्रवासाला निघतात..तुंबाडची मंजुळामधील पहिलं गाणं प्रदर्शित; राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी केलंय स्वरबद्ध."महामार्गावर सध्या असलेल्या उन्हात वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. या मार्गावरून मी नेहमी प्रवास करतो परंतु, सध्या प्रवास टाळतो. वाढत्या तापमानात वाहनांचे टायर गरम आल्याने अपघाताचा धोका वाढतो. प्रवास करावयाचा असल्यास सकाळी नऊ पर्यंत आणि सायंकाळी सहा नंतर करणे परवडणारे आहे."- नंदू भोले, वाहन मालक वर्धा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.