Wardha Heatwave Update: वर्धा सर्वात ‘हॉट’ शहर; पारा ४७.१ अंशांवर, पुढील २४ तास आणखी भयानक असण्याची शक्यता

देशातील सर्वाधिक ४७.१ अंशांवर वर्ध्याचा पारा; दिवसभर उकाड्याचा कहर, नागरिक घरातच कोंडले
Record-Breaking Heat: Wardha Becomes India’s Hottest City at 47.1°C

Record-Breaking Heat: Wardha Becomes India’s Hottest City at 47.1°C

esakal

Updated on

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह संपूर्ण राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. यातच आता वर्धा शहर देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंदवले गेले आहे. मध्यंतरी सलग दोन दिवस येथील तापमान ४६ ते ४६.५ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. मात्र, बुधवारी तापमानाने नवीन उच्चांक गाठत ४७.१ अंश सेल्सिअसची नाेंद केली. या प्रचंड उन्हामुळे संपूर्ण वर्धेकरांच्या अंगाची लाहीलाही हाेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com