

Wardha
esakal
वर्धा: अवकाळी पाऊस, दुष्काळ, नापिकी, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि बाजारात मिळणारे कमी भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाईची तलवार लटकविणारा कृषी विभागाचा आदेश समोर आल्याने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.