Wardha Crime: वर्ध्यातली १७ वर्षीय रील स्टार काजलने संपवले जीवन, मोहब्बत की दुकान रीलमुळे झालेली प्रसिद्ध; धरणात आढळला मृतदेह
Wardha News: वर्ध्यातील रिधोरा धरणात १७ वर्षीय तरुणीने उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
वर्धा : सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर १७ वर्षीय तरुणीने रिधोरा धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ११) उघडकीस आली आहे. काजल गजानन रोकडे (वय १७, रा. रामनगर, वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे.