Wardha Road Accident: स्कूल व्हॅनला अपघात, सहा गंभीर; करंजी-काजी जवळील अपघात : जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

School Van Accident Near Karanji Kazi: सहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
Wardha Road Accident

Wardha Road Accident

esakal

Updated on

वर्धा: शहरालगतच्या मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरात सोमवारी (ता. ३) सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात स्कूल व्हॅनमधील १५ विद्यार्थी जखमी झाले. त्यातील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com