

Wardha Tiger Sighting
esakal
वर्धा: हिंगणी-माळेगाव ठेका मार्गावर वाघाचे दर्शन होत असल्याने या परिसरातील जंगलालगतच्या शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोहदा कला, धामणगाव आणि सालई पेवट परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, डोंगरगाव तलाव व त्याच्या सभोवतालचे राखीव जंगल यामुळे हा परिसर वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमणमार्गाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.