Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

Wardha Crime News पुतण्याने काका आणि चुलत भावावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्यांची जीवनयात्रा संपवली. वरातीच्या जल्लोषात घडलेल्या या भीषण शोकांतिकेमुळे लग्नाचे घर सुतकात बुडाले.
crime news

crime news

Sakal
Updated on

वर्धा, ता. ५ : शहरात शनिवारी (ता. चार) रात्री एका लग्नसमारंभात रक्ताचा सडा पडला. जमिनीच्या वादातून पुतण्याने काका आणि चुलत भावावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्यांची जीवनयात्रा संपवली. वरातीच्या जल्लोषात घडलेल्या या भीषण शोकांतिकेमुळे लग्नाचे घर सुतकात बुडाले. महिला आश्रम परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण वर्धा शहर हादरून गेले आहे. आराेपीला पाेलिसांनी अटक केली. Wardha wedding tragedy minor accused in double killing case police begin investigation

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com