गोंडेगाव कुंडबाबावासीयांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

नागपूर : शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सिंचन क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. जागेअभावी अनेक प्रकल्प रखडले आहेत. दुसरीकडे नागरिकांची मागणी असतानाही धरण तयार करण्यास टाळाटाळ होत आहे. नरखेड येथे धरण तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ प्रशासन दरबारी खेटा घालत आहे. मात्र, अद्याप त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

नरखेड तालुका संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणूनही ओळखले जाते. या भागात पाण्याची कमतरता आहे. पाण्याअभावी येथील संत्रा बागा उद्‌ध्वस्त होताहेत. त्यामुळे येथे मोठे धरण तयार करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. गेल्या चार वर्षांपासून यासाठी येथील धरण कृती समितीने शासन दरबारी मागणी लावून धरली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही धरण तयार करण्याबाबतचे आश्‍वासन दिले होते. त्याचप्रमाणे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धरणाबाबत आश्‍वासन दिले. धरणासाठी आवश्‍यक सर्वेक्षणासाठी 6 लाख 64 हजार 240 रुपयेही मंजूर केले. मात्र, अद्यापपर्यंत काम सुरू झाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. येथील कसबा, गोंडेगाव, माणिकवाडा, भायवाडी, बेलोना, येरला, इंदोरा, गंगालडोह गावांतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warn of boycott of elections