Washim : हे बसस्थानक की शहराचा उकिरडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Washim

Washim : हे बसस्थानक की शहराचा उकिरडा

मालेगाव : मालेगाव शहरातील बस स्थानकात सुविधांचा अभाव आहे. येथे पेयजल, पंखे व सुरक्षा रक्षक नाही. फक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत वाहतूक नियंत्रक असतात. पूर्णवेळ वाहतूक नियंत्रक नेमण्याची गरज आहे.

पूर्णवेळ वाहतूक नियंत्रक नसल्याने बऱ्याच बस बसस्थानकावर जात नाहीत.या बस स्थानकात पेयजलाची सुविधा नाही. नगर पंचायतचे धरणातील पाण्याच्या नळाचे कनेक्शन आहे . ते पाणि पिण्यायोग्य नाही. तेही पाणी कमी येते.एसटीने बसस्थानकात पेयजलाची सुविधा उपलब्ध करावयास पाहिजे. मालेगाव येथील बसस्थानकात बस जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे .बऱ्याच लांब पलल्याच्या बस स्थानकात जात नाहीत.

हे बस स्थानक तहसील कार्यालयाजवळ आहे .येथून पंचायत समिती, ग्रामिण रुग्णालय , रामराव झनक महाविद्यालय, शिक्षक कॉलनी,महसूल कॉलनी,गांधीनगर, नवीन मालेगाव ,नगर पंचायत,आठवडी बाजार जवळ आहे .या बस स्थानकावरून शेलूबाझार, आमखेडा, अमानवाडीकडे जाणे सोयीचे आहे.

बस स्थानकात जाणे क्रमप्राप्त असताना बरेच चालक बस शेलुफाटा व जुने बस येथून वळवून नेतात. तर वाशीम,अकोला, रिसोडकडे जाणाऱ्या बस बऱ्याच वेळा बस स्थानकांवर न नेता परस्पर जातात.यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होते .बस स्थानकांवर नेण्याबाबत सूचना वाशीम वाहतूक नियंत्रण कक्षात लावलेली आहे. परंतु तीचे पालन होताना दिसत नाही. बस स्थानकात पंखे नाहीत .बस स्थानक व परिसरात आवशक तेवढे विद्युत दिवे नाहीत. इथे सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे.बसस्थानकात आवश्यक सुविधा पुरवायला पाहिजे .सर्व बस बसस्थानकात जातील याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे असे सामाजिक कार्यकर्ते शंकर ईरतकर यांचा आग्रह आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यांनी वारंवार भेटी देऊन प्रवाश्यांना सुविधा मिळतात किंवा नाही तें पहावे.तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे कळवले आहे.

- मधुकर देवकते, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Washimst busBus Stand