
वाशिम शहरातील गणेशपेठ आणि बागवानपुरा परिसरात काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दोन समुदायांमध्ये तुंबळ राडा झाला. फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या या घटनेने हिंसक वळण घेतले. यावेळी 100 ते 150 लोकांनी तलवारी, काठ्या आणि इतर हत्यारांसह हल्ला केला. या हल्ल्यात अनेक गाड्यांची तोडफोड झाली, दगडफेक झाली आणि अनेकजण जखमी झाले. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे.