Washim Crime : काटा जिल्हा परिषद शाळेत १४ मुलीसोबत अत्याचार; आरोपी शिक्षक गजाआड

शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेतच एका ५६ वर्षीय शिक्षकाने गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना आली समोर.
Washim crime

Washim crime

Esakal

Updated on

वाशीम - शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेतच एका ५६ वर्षीय शिक्षकाने गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. वाशीम तालुक्यातील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका ५६ वर्षीय नराधम शिक्षकाने तिसरी व चौथीतील तब्बल १४ अल्पवयीन विद्यार्थिनींवर गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अश्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याची चीड आणणारी बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक दिलीप बोरकर ( वय ५६) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com