Washim Politics : आकांक्षित जिल्ह्याचे प्रश्न विधिमंडळात पोचतील का? जिल्ह्यात सहा आमदार,अनेक प्रश्न अधांतरी
Washim Development : वाशीम जिल्ह्यावर ‘आकांक्षित जिल्हा’ हा शिक्का बसलेला असून, तो पुसण्याचं मोठं आव्हान लोकप्रतिनिधींसमोर आहे. पावसाळी अधिवेशनात जिल्ह्याचे प्रश्न किती आमदार प्रभावीपणे मांडतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
वाशीम : आकांक्षित जिल्ह्याचा दुर्दैवी ठपका बसलेल्या वाशीम जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसमोर हा शिक्का मिरविण्याचे नव्हे तर हा शिक्का पुसण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यात विधान सभेचे तीन तर विधान परिषदेचे चार आमदार आहेत.