Washim : शेतकरी अडकतात सिबिलच्या फेऱ्यात!

पीक कर्ज मिळण्यास होत आहे विलंब : रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या
Washim
Washim Sakal

शिरपूर : शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना व इतर कर्ज वितरित करत असताना बँकांनी आता सिबिलची अट घातली आहे. बँका आता पीक कर्ज देण्यास सुद्धा शेतकऱ्यांना टाळाटाळ करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे याविरुद्ध शेतकरी वर्गाकडून तीव्र संतापाची लाट उसळत आहे.

सिबिल, म्हणजे ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड ही खाजगी कंपनी सिबिलचा स्कोर तयार करत असते. त्यानुसार बँका पीक कर्ज व इतर कर्ज वितरण करण्यापूर्वी कर्जदारांचे सिबिल तपासतात. सिबीलचा स्कोर व्यवस्थित असला तरच त्या कर्जदारास कर्ज पुरवठा करण्यास संमती दिल्या जाते. अन्यथा सिबिलचा स्कोर व्यवस्थित नसल्याचे कारण पुढे करून त्या कर्जदाराचे कर्ज मागणी अर्ज रद्द करण्यात येतो. आता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करतानाही काही बँकांनी सिबलच्या जाचक अट घातली आहे. ज्या शेतकऱ्यांचे सिबिल क्लियर नाही किंवा स्कोर कमी आहे. अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सुलभ व शक्य तितक्या लवकर व कमीत कमी अटी शर्ती लावून पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी व इतर खर्चासाठी तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात येतो. यामध्ये दीड लाख रुपयापर्यंत केंद्र सरकारकडून तर दीड लाख रुपयांपर्यंत राज्य सरकारकडून असे तीन लाख रुपयांपर्यंत कर्जावरील व्याज माफी शेतकऱ्यांना देण्यात येते. मात्र काही बँकांनी शासनाच्या नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

अनेक अटी शर्थी लावून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो त्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत. कर्ज देण्यासाठी बँकां अनेक असंविधानिक अटी शर्ती लावून, कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. काही बँका तीन लाख रुपये पेक्षा जास्त कर्ज फाईल मंजुरीसाठी हेड ऑफिस कडे पाठवण्यात येतात त्यामध्ये बराच वेळ खर्च होतो कर्जमाफी पद्धत जटील होऊन बसते बँकांनी कुठेतरी शेतकऱ्यांचा विचार करायला हवा व शेतकऱ्यांना पीक कर्ज सिबिलची अट न लावता पिक कर्ज पुरवठा व्हावा अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.

शिरपूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमधून मी सहा महिन्यापूर्वी कर्ज मागणीसाठी अर्ज केला होता. पीककर्ज तीन लाख रुपयांच्या वर असल्याने सदर फाईल मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठण्यात आली होती. त्यामध्ये जमानतदाराचे सिबिल बरोबर नसल्याचे कारण पुढे करून त्रुटी काढून, फाईल दोन वेळा वापस करण्यात आली होती. त्यामुळे मला पीक कर्ज मिळण्यासाठी तब्बल सहा महिन्याचा कालावधी लागला. त्यामुळे ही सिबीलची जाचक अट पीक कर्जासाठी रद्द करण्यात यावी व शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा करण्यात यावा.

अमोल देशमुख, शेतकरी शिरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com