

Washim News
esakal
वाशीम: वाढती हवामान अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसमोरील संकट अधिक गडद होत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवणे आव्हानात्मक बनले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मार्फत ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येत आहे.