

Vidarbha News
esakal
वाशीम: पाणी जीवनावश्यक गरज असताना वाशीम शहरातील नागरिकांना गेल्या २५ वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विदारक वास्तव आहे. एका घराला दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांना वर्षभर उन्हाळ्याचीच झळ सहन करावी लागते. निवडणुकांच्या तोंडावर मुबलक पाण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात शहरवासीयांचा घसा कोरडा आहे.