पिस्तूलच्या धाकावर एटीएम लुटण्याचा प्रयत्न

washim:Attempts to rob an ATM over a pistol
washim:Attempts to rob an ATM over a pistol

मेडशी (जि.वाशीम) : एटीएमच्या सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (ता.20) पहाटे दोन वाजताच्या सुमारास येथील अकोला-नांदेड महामार्गावरील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये घडली. या एटीएममध्ये जवळपास आठ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.
मेडशी येथील बसस्टँडवर सेंट्रल बँकेचे एटीएम आहे. या एटीएमवर शुक्रवारी (ता.20) पहाटे दोन वाजताच्या सुमारास तिघे जण आले. त्यातील एकाने सुरक्षा रक्षक नीलेश सतिश घुगे यांना दवाखान्यासाठी पैसे काढायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी शटरचे कुलूप उघडले. यावेळी एकाने त्यांना पिस्तुलचा धाक दाखवून आतील खोलीत नेले.
तर एकाने गॅस कटरद्वारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकजण बाहेर लक्ष ठेऊन उभा होता. यावेळी एटीएममध्ये एसलेल्या सीसीकॅमेर्‍यास पांढरा रंग लावला होता. पंधरा ते 20 मिनीटानंतरही एटीएम फोडण्यात यश आले नाही. त्यामुळे सदरील एटीएमचा अलार्म वाजल्यामुळे या तिन्हीही चोरट्यांनी चारचाकी वाहनातून धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सोनोने, साहयक पोलिस निरीक्षक बन्सोड, नाईक पोलिस संदीप निखाडे, जमादार कालापाड, विलास गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोनोने यांच्या मार्गदर्शनात बन्सोड, कालापाड, विलास गायकवाड करीत आहेत.

पुणे -मुंबई येथील कोंट्रोलरूममधून धडकले फोन
एटीएम कंट्रोल रुम पुणे व मुंबई येथे या चोरीचे फुटेज पाहण्यात आले. तेव्हा तातडीने त्यांनी वाशीम कंट्रोल रुमशी संपर्क साधला. त्यानंतर मालेगाव व मेडशी पोलिसांना माहिती दिली. पोलिस कर्मचारी विलास गायकवाड घटनास्थळी आले असता, पाच मिनीटांपूर्वीच चोरटे पळून गेले होते.

मला बंदुकीचा धाक दाखवून आतमधील खोलीत नेले. तसेच माझ्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन एटीएममध्ये किती रोकड आहे? याबाबत विचारणा केली. याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. तसेच मला न मारण्याची विनवणी केली.
-नीलेश घुगे, सुरक्षारक्षक एटीएम केंद्र मेडशी ता. मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com