Water Crisis : चौदा गावांना खडकपूर्णाचे पाणी मिळणार; पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना, पालकमंत्र्यांनी घेतला सविस्तर आढावा
Makarand Patil : बुलढाणा जिल्ह्यातील १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी पाणीटंचाई निवारणासाठी सविस्तर आढावा घेतला.
बुलढाणा : जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा मंगळवार ८ एप्रिल रोजी आढावा घेतला. यावेळी खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदई व इतर १४ गावांना पाणी उपलब्ध करणे यासह विविध विषयांचा आढावा घेतला.