अर्चना फाटे मोताळा : शासनाच्या ''पाणी अडवा, पाणी जिरवा'' या लोकोपयोगी अभियानाचे फलित काय हे सिंदखेड येथील विहिरीला १२ फुटावर लागलेल्या पाण्याने दाखवून दिले आहे. पाणी फाउंडेशनमुळे हे शक्य झाले आहे..सिंदखेड हे गाव जलसंधारणाच्या कामामुळे पाणीदार झाले आहे. हे सर्व श्रेय जाते ते या गावातील नागरिक व ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना विशेषतः या गावातील तरुणाईने जे श्रमदान केले ते अविश्वसनीय आहे. सिंदखेड या गावाने एक प्रकारे विकासाच्या बाबतीत क्रांती घडवली आहे. १५ हजार घन मिटर सीसीटी, माती बांध, दगडी बांध , ६५ हजार घनमीटर २६ शेततळे व मोठे मातीबांध, १५ हजार घनमिटर नदीवरील सिमेंट बांध, बांध बंदिस्थी १५ हजार घनमीटर अशी जलसंधारणाची कामे केली आहेत. सोबतच मियावाकी प्रकल्प या गावात साकारला असून त्याचे संगोपन सुरू आहे..मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील छोटे - मोठे बांध तुडुंब भरले होते परिणामी जळपातळीत वाढ झाली आहे. नुकतीच सिंदखेड शिवारात एक विहिरी खोदण्यास सुरुवात झाली. जलसंधारणाच्या कामामुळे ही क्रांती घडली आहे. गावगाड्याचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर गावातील गट - तट व राजकारण थांबल्यास शक्य होते. सिंदखेड या गावाने हे सिद्ध केले आहे. पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून हे गाव पाणीदार झाले आहे..पानी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होत शिस्त आणि शास्त्राला अनुसरून या गावाने जलसंधारणाचे मोठे काम उभे केले आहे. स्पर्धेचा भाग म्हणून गावाला राज्य स्तरीय द्वितीय पारितोषिक देखील मिळाले आहे. या कामाचा परिणाम म्हणून नुकताच मे महिनाच्या रखरखत्या उन्हात सिंदखेड शिवारात रामनिवास लावकर यांनी विहीर खोदकाम सुरु केले त्याना फक्त १२ फुटावर पानी लागले आहे. ही बाब जलसंधारणाच्या कामाचे महत्व अधोरेखित करणारी आहे.- निलेश बढे, पानी फाऊंडेशन समन्वयक..सहा वर्ष आधी खरीप हंगामासाठीही पानी नसलेले आमचे गाव आता खरीप, रब्बी, उन्हाळी तिन्हीही हंगामात पीक घेत आहे. वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सुरु झालेला जलसंधारण कामाचा यज्ञ अजूनही अखंडपणे सुरु आहे. जलसंधारण,वृक्षलागवड,गवत लागवड पानी व्यवस्थापन या विषयावर आमचे काम सुरु आहे. १००% जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना शेतीसाठी पानी उपलब्ध होत आहे यातून गावात समृद्धी येत आहे.- प्रवीण कदम, सरपंच सिंदखेड.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.