पाणी वाचवा... जीवन वाचवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

विद्यार्थ्यांचा संदेश - पाणीबचतीवर वक्‍तृत्व स्पर्धा, सकाळ एनआयईचा उपक्रम  
नागपूर - पाणी म्हणजे जीवन. दिवसेंदिवस पाण्याचा अपव्यय वाढत आहे. वापराच्या तुलनेत पाणी कमी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साठविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने पाण्याची बचत करणे काळाची गरज असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.   

सकाळ एनआयईतर्फे प्रसादनगर येथील सरस्वती शिशुमंदिर, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘पाणी बचत : काळाची गरज’ विषयावर शुक्रवारी वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात आली. दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या भीषण होत असल्याने भविष्यात पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त होईल. या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर, हा एकमेव उपाय असल्याचे सांगत पाण्याची बचत करण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी यावेळी केला. मंचावर संस्थेचे सचिव प्रशांत बोपर्डीकर, मुख्याध्यापिका मृदुल भुते, माध्यमिकचे मुख्याध्यापक राहुल गाडगे, अर्चना माहुरे, आरती धांडे, जयमाला वानखेडे, श्रीमती देशपांडे, पंचम परते, निशांत मुठे, मुकेश वाघमारे उपस्थित होते.

स्पर्धेत विजेते ठरलेले संतोष बोपचे, यशश्री पवार, योगिनी बोंडे यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वैशाली बगडे व भारती देवघरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. संचालन अपेक्षा झोड यांनी केले. आभार मृदुल भुते यांनी मानले.  

‘सकाळ एनआयईचा उपक्रम कौतुकास्पद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो. विशेषत: विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढण्याकरिता मदत होते. सकाळने भविष्यातही नियमितपणे असे उपक्रम राबवावे. 
- प्रशांत बोपर्डीकर, सचिव, केशव माधव शिक्षण संस्था  

विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम होत राहिल्यास त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो. मंचावर बोलण्याचे त्यांचे धाडस वाढते. पाणी म्हणजे जीवन, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत असल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार. 
- मृदुल भुते, मुख्याध्यापिका, सरस्वती शिशुमंदिर 

आज नागसेन माध्यमिक विद्यालय 
शनिवारी (ता. १८) कामठी मार्गावरील दहा नं. पूल येथील नागसेन माध्यमिक विद्यालयात ‘प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ एनआयईतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: water saving... life saving