Water Shortage : रिसोड तालुक्यातील 40 गावे तहानेने व्याकूळ

रणरणत्या उन्हात कृत्रिम पाणी टंचाईच्या उष्ण झळा; अनेक गावांत केवळ नियोजनाअभावी महिलांचे हाल.
water shortage in risod tahsil
water shortage in risod tahsilsakal

- वसंत खडसे

रिसोड - तापमानाचा पारा जस जसा वाढत जातो तसा आपसूकच पाण्याचा साठा आटत जातो. एकट्या रिसोड तालुक्यात तब्बल 40 गावे तहानेने व्याकूळ झाल्याची बाब समोर आली आहे. ही सेंट्रल ग्राउंड रिपोर्ट सर्वेक्षणानुसार सेमि क्रिटीकल वर्गात मोडत असल्याचे वास्तव आहे.

दरवर्षी ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या समास्या डोके वर काढतात हि नित्याचीच बाब झाली आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यात बऱ्याच प्रमाणत यश प्राप्त झाले असले, तरी केवळ नियोजनाअभावी अनेक गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना आजही करावा लागत असल्याची माहिती हाती आली आहे.

कुठे विद्युत पुरवठ्यातअभावी, तर कुठे विहीर खचल्यामुळे तर अनेक गावात योजनेच्या अपूर्ण कामांमुळे पाणी टंचाईच्या उष्ण झळा पाहावयास मिळत आहेत. परिणामी महिलांना पायपीट करत दूरवरून पाणी आणावे लागत आहे.

प्रत्येक व्यक्तीसाठी शाश्वत पाणीपुरवठा व्हावा म्हणुन जल जीवन मिशनच्या माध्यमातून अनेक गावांना मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु केवळ नियोजनाअभावी सदर योजना थंडबस्त्यात पडल्या आहेत. परिणामी ज्या गावातील विहिरीला भरपूर पाणी आहे त्या गावातील पाईप लाईन होणे बाकी आहे.तर काही गावात विहीर व पाईप लाईन झाली आहे.

परंतु पाणी साठवुन ठेवणाऱ्या जलकुंभाचे काम बाकी आहे. तद्वतच काही ठिकाणी काम पुर्ण झाले आहे मात्र योजना कार्यान्वित होण्याआधीच विहीर खचली असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरित पाहता सर्व काही असुन सुद्धा केवळ नियोजनशून्य कारभारामुळे संबंधित गावकऱ्यांना कृतिम पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

यात तालुक्यातील प्रामुख्याने मांगवाडी तेथे खूपच बिकट परिस्थिती असल्याची माहिती हाती आली आहे. येथील अबाल वृद्धांना सुद्धा पिण्याचे पाणी हातपंपावरून किंव्हा शेतातील विहीरीवरून डोक्यावर आणावे लागत आहे. तर सधन कुटुंब आपापल्या कुवती प्रमाणे खाजगी टँकरद्वारे पाणी समस्या सोडवित असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच महागाव येथे जुनी जलस्वराज्य योजना कार्यान्वित आहे, पण विद्युत लोडशेडींगच्या वेळा पत्रकानुसार येथे हप्त्यातील फक्त तीन दिवस दिवसा विद्युत पुरवठा सूरू असतो बाकी चार दिवस रात्री साडे दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सूरू असतो. परिणामी रात्री नळाद्वारे पाणी सोडणे अशक्य होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या गंभीर बाबीकडे संबंधितांनी त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

"आमच्या येथील पाणी पुरवठ्यासाठी खाजगी विहिर सुद्धा अधिग्रहित केली आहे. परंतु विद्युत भारनियमनामुळे हप्त्यातील चार दिवस विद्युत पुरवठा रात्री सूरू असतो त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. या बाबत रिसोड येथील विज वितरणच्या कार्यालयाशी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. परंतु त्यांनी प्रत्येक वेळी हो ला हो लावून आमच्या समस्येकडे पाठ फिरवली आहे."

- संतोष मवाळ, (सामाजिक कार्यकर्ते, महागाव ता. रिसोड)

खर्च कोट्यावधीचा तरीही घागर रिकामीच

जलस्वराज्य योजना, जलजीवन मिशन या योजनांवर कोट्यावधी रूपये खर्च झाले आहेत. मात्र या योजनांची देखभाल होत नसल्याने नियोजनाअभावी तालुक्यातील 40 गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. ही गावे आधीच सेमि क्रिटीकल श्रेणीत येत असतांना या गावांमधे जलजिवन मिशनच्या विहिरी खोदल्या गेल्या परिणामी विहिरीतच पाणी नसल्याने योजना कोलमडल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com