मेळघाटात जलस्रोत आटले; शेतमजूर, गुराखी भागवतात डबक्यातील पाण्याने तहान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water shortage

चिखलदरा तालुक्यातील जमीन ही डोंगराळ व खडकाळ आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, पण उन्हाळा लागताच पाणीटंचाई डोके वर काढते.

मेळघाटात जलस्रोत आटले; शेतमजूर, गुराखी भागवतात डबक्यातील पाण्याने तहान

जामली (जि. अमरावती) - चिखलदरा तालुक्यातील जमीन (Land) ही डोंगराळ व खडकाळ आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस (Rain) पडतो, पण उन्हाळा लागताच पाणीटंचाई (Water Shortage) डोके वर काढते. अशातच येथील शेती करणारे शेतकरी शेतमजूर व गुरेढोरे चारणारे आपली तहान साचलेल्या डबक्यात भागवत असल्याची धक्कादायक स्थिती आहे.

सध्या उन्हाचा पारा ४० ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोचला आहे. त्यातच खरीपपूर्व हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीला नांगर, वखर, कचरा वेचणे, जाळणे या कामांनी वेग धरला आहे. शेतात काम करीत असताना अंगाची लाही लाही होत आहे. त्यातही शेताच्या जवळपास पाणी मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, गुराखी जवळपासच्या जंगलातील नदीनाल्यात मिळेल तेथे जाऊन डबक्यातील किंवा झऱ्यातील पाणी पीत आहेत. दूषित पाण्यामुळे मेळघाटात साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या हगवण, उलटी, डोके दुखणे, शौचास तसेच टायफाइड अशा प्रकारच्या रुग्णांत वाढ झालेली आहे.

अशुद्ध पाणी पिऊ नका

उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरी, शेतमजुरांची घरातील स्वच्छ पाणी शेतात सोबत घेऊन जावे. नाल्यातील साचलेले वा डबक्यातील अशुद्ध पाणी पिऊ नये. कानाला रुमाल बांधावा व सकाळच्या प्रहरामध्येच काम करावे, असे आवाहन टेंब्रुसोंडा येथील आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळकर यांनी केले आहे.

गावातील विहिरीला तडे गेले आहेत. त्यातच घरी पाणी भरण्यासाठी खूप सारा वेळ निघून जातो. शेतात काम करीत असताना तहान लागल्यास नाल्यावरील झऱ्याचे पाणीच प्यावे लागते.

- भुलूबाई भाकरे, शेतमजूर

Web Title: Water Sources In Melghat Are Blocked Agricultural Laborers Cowherds Quench Their Thirst With Puddle Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top