कमकुवत विद्यार्थ्यांना शिक्षक घेणार दत्तक

teacher1.jpg
teacher1.jpg
Updated on

अकोला : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्याध्यापकांना एक्शन प्लॅन दिला आहे. यात मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार कमकुवत विद्यार्थ्यांना शिक्षक दत्तक घेणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

इयत्ता 10वीचा निकाल 100 टक्के लागण्यासाठी 4 ते 14 नोव्हेंबर दरम्यान जिल्हा परिषदेत मुख्याध्यापकांचे सादरीकरण घेण्यात आले. त्यानंतर त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेने दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा. गणितासाठी स्टेप मार्किंगचे स्वरुप समजावून सांगावे. कमकुवत विद्यार्थ्यांची दत्तक योजना राबविण्यात यावी आणि याची जबाबदारी विषय शिक्षकाला देण्यात यावी.

गुणवत्तेचा आढावा वर्ग शिक्षकांसोबत घेण्यात यावा. विज्ञानामधील रासायनिक सूत्रे, महत्त्वाच्या आकृत्या, प्रात्यक्षिके वारंवार करुन घेण्यात यावीत. भाषा विषयासाठी लेखन कौशल्याचा जास्तीत-जास्त सराव करुन घेण्यात यावा. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेळी असलेले वातावरण सराव परिक्षेसाठी तयार करुन देण्यात यावे, अशा प्रकारच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदमा वाटप
मुलांची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी शाळेकडून बादामचे वितरण करण्यात यावे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्याध्यापकांना पाठलेल्या मार्गदर्शक सूचनाच्या पत्रात नमूद केले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनुपयोगी असलेले कोणतेही उपक्रम राबविण्यात येऊ नयेत, असेही पत्रात म्हटले आहे. 

शिक्षण विभागाला द्यावा लागतील भेटी
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांने भेटी देऊन मार्गदशन करावे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्याध्यापकांना पाठलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या पत्रात नमूद केले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने याबाबतची माहिती तक्त्यांमध्ये भरावी आणि त्याआधारे आढावा घ्यावे असेही प्रशासनाने पत्रात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Superintendent of Police Kumar Chinta instructed school heads to install CCTV cameras, maintain complaint boxes and ensure proper verification of school transport staff.
His sacrifice has left his native village Marartola and Kurkheda taluka mourning.
Invitations Distributed, Venue Ready—But Groom Never Arrived Over Dowry Dispute
Young Voice, Strong Resolve: Namrata's Journey to Jantar Mantar Inspires Fellow Students
Marathi News Esakal
www.esakal.com