Video : मास्क लावून घरातच उरकले शुभमंगल !

wedding in corona.jpeg
wedding in corona.jpeg

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : रश्‍मी अन् अभिषेकचा विवाह सोहळा गुरुवारी (ता.19) मोठ्या दिमाखात साजरा होणार होता. परंतु कोरोनाबाबत खरबदारी घेत त्यांच्या कुटुंबियांनी स्वतः पुढाकार घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला.

विवाह सोहळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गडबडून न जाता, हिंमतीने त्या दोघांनी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला अन् चेहऱ्याला मास्क लावून अंगणात आणि काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोघांचे शुभमंगल झाले.

सॅनेटायजरचा वापर
बुलडाणा जिल्ह्यातील सिनगाव जहॉगिर (ता.देऊळगावराजा) येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात मोजक्याच नातेवाइकांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे एरवी वऱ्हाड्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर अत्तर शिंपडण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सॅनेटायजर वापरण्यात आले. इतकेच काय तर भटजींनी सुद्धा तोंडाला मास्क लावून मंत्रोपचार करून रेशीमगाठी बांधल्या. प्रत्येकानेच पुरेपूर काळजी घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

मुहूर्तावरच लग्न उरकले
भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा म्हणजे दोन मनांचे अन् दोन परिवारांचे मिलन समजल्या जातो. हा मंगल अन् सुखद क्षण असतो. याप्रसंगी वधु-वरास आर्शिवाद देण्यासाठी प्रत्येकाला आग्रहाचे निमंत्रण देखील देण्यात येते. तसेच पूजा आणि प्रदिपच्या विवाह सोहळ्यासाठी निमंत्रणे देण्यात आली होती. मात्र, गजानन सरोदे (रा.सिनगाव जहॉगिर ता. देऊळगावराजा) व आश्रुबा चोपडे (सवणा ता. चिखली) यांच्या दोन्ही परिवाराने न डगमगता ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न उरकण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com