esakal | संचारबंदीत भरला आठवडी बाजार; मग झाले असे...
sakal

बोलून बातमी शोधा

janefal bajar.jpg

सध्या संचारबंदी चालू असल्याने जिल्ह्यासह जानेफळ येथेही आठवडी बाजार भरू नये अशा सूचना ग्रामपंचायतस्तरावरून व संबंधित विभागाकडून लाऊडस्पीकर द्वारे व इतर प्रसार माध्यमाद्वारे देण्यात आल्या होत्या.

संचारबंदीत भरला आठवडी बाजार; मग झाले असे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहकर (जि.बुलडाणा) : सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहे. मात्र, संचारबंदी व जमाबंदीचे उल्लंघन करून मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे आज (ता.4) आठवडी बाजारात परवानगी नसतानाही काही व्यक्तींनी दुकाने लावून गर्दी करत संचारबंदीसह जमाबंदीचे उल्लंघन केले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या आदेशावरून तलाठी विजेंद्र धोंडगे यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून 19 व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र जमाबंदी व संचार बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. दरम्यान जानेफळ येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. जानेफळ परिसरातून बाजारा करिता शेकडो लोक दर शनिवारी जानेफळ येथे येत असतात. मात्र, सध्या संचारबंदी चालू असल्याने जिल्ह्यासह जानेफळ येथेही आठवडी बाजार भरू नये अशा सूचना ग्रामपंचायतस्तरावरून व संबंधित विभागाकडून लाऊडस्पीकर द्वारे व इतर प्रसार माध्यमाद्वारे देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही 4 एप्रिलला जानेफळ येथे काही व्यक्तींनी आठवडी बाजारात परवानगी नसतानाही आपली दुकाने थाटली व गर्दी जमा करण्यास कारणीभूत ठरले. 

आवश्‍यक वाचा - निजामुद्दीनहून परतलेल्यांचा अहवाल बघा काय आला!

त्यामुळे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या आदेशावरून तलाठी विजेंद्र धोंडगे यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून शेख इमरान शेख रियाज रा. सोनार गव्हाण, कादर शेख ममुलाल रा. जानेफळ, गजानन एकनाथ गुमटकर, श्रीधर समाधान चांदणे, गोपाल काळबांडे रा. मुंदेफळ, गणेश प्रभाकर रोकडे रा. जानेफळ, संजय कुंडलिक गोरे रा. जानेफळ, कैलास दौलत डवंगे रा. बोथा, आयुब शहा महबूब शाह रा. जानेफळ, संतोष करवंदे रा. जानेफळ, भानुदास हरिभाऊ मोसंबे रा. मोसंबेवाडी, बाळू दगडुबा जाधव रा. जानेफळ, संतोष एकनाथ काळोख रा. जानेफळ, भारत आत्माराम खंडागळे, हुसेन तांबोळी पानवाले रा. उटी, गणेश पंजाब शेलार रा. जानेफळ, शेख फारुख शेख मजीद रा. जानेफळ यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. जिल्हा दंडाधिकारी बुलडाणा यांच्या जमाबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार संबंधितावर कारवाई करण्यासाठी फिर्याद दिली आहे.