विचित्र! डागाची "ओटी' दोन दिवस मेयोला उसनवारीवर 

विचित्र! डागाची "ओटी' दोन दिवस मेयोला उसनवारीवर 

नागपूर : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागात नेत्र रुग्णांवर "फेको' यंत्रावर शस्त्रक्रिया होत नसल्याचे उघड झाले. यानंतर या विभागाचे शस्त्रक्रियागार बंद पडले अन्‌ मेयोतील रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात येऊ लागले. शासकीय "डागा' स्मृती स्त्री रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर मेयोला आठवड्यात दोन दिवस उसनवारीवर मिळते. अशी दयनीय अवस्था वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्राचीन अशा मेयो रुग्णालयाची झाली आहे. 
शंभर कोटी खर्चून दोन वर्षांपूर्वी मेयो रुग्णालयात चार माळ्यांचे "सर्जिकल कॉम्प्लेक्‍स' तयार करण्यात आले. मेयो सुधारतेय असे चित्र दिसत होते. यात कायमस्वरूपी अधिष्ठाता मिळाले. परंतु, मेयोत विकासाचे आणि रुग्णसेवेचे भिजतघोंगडे कायमच टांगणीवर आहे. सर्जिकल कॉम्प्लेक्‍समध्ये तळमजल्यावर शल्यक्रिया विभाग, पहिल्या माळ्यावर अस्थिरोग, तिसऱ्या माळ्यावर नेत्र आणि चौथ्या माळ्यावर कान-नाक-घसा विभागासाठी चार स्वतंत्र शस्त्रक्रियागार बांधण्यात आले. रुग्णसेवेत ऑपरेशन थिऐटर रुजू झाले. मात्र, येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाने तीन महिन्यांपासून सर्व शल्यक्रियाग्रहांना फंगसची (बुरशी) लागण झाली आणि सर्व ऑपरेशन थिऐटरमध्ये शस्त्रक्रियांना "थांबा' लागला आहे. आणखी महिनाभर मेयोतील शस्त्रक्रियागारांमध्ये शस्त्रक्रिया होणार नाही. यामुळे गरीब रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो किंवा दोन महिन्यानंतरची तारीख देऊन बोळवण केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com