
अमरावती : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येस असलेल्या प्रमुख कारणांपैकी सिंचनाचा अभाव हे एक कारण आहे. या भागात जून २०२४ अखेर सिंचनाचा ३ लाख ५७ हजार ७११ हेक्टरचा अनुशेष शिल्लक असून, त्यासाठी निधीची बोंब आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी ३५ हजार ७२० कोटी रुपयांची गरज असताना राज्य सरकारने केवळ २ हजार ५९० कोटींची तरतूद केली आहे.