काय? अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 263 किमीचे रस्ते खराब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 263 किमीचे रस्ते खराब झाले असून, यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामविकास खात्याला पाठविला आहे. मोठ्या-मोठ्या पुलांचेही नुकसान झाल्याचे प्रस्ताव नमूद केले आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. 26 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली. यामुळे 263 किमीचे 138 रस्त्यांची दुरवस्था झाली. सर्वाधिक नुकसान कुही तालुक्‍यात झाले. येथील 55 किमीचे रस्ते खराब आहे. दुसरा क्रमांक हा हिंगणा तालुक्‍याचा लागत असून, 44 किमीचे रस्ते खराब आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रवासात आडकाठी निर्माण होत आहे. या सर्वांची दुरुस्ती करायची झाल्यास 60 कोटी नऊ लाखांच्या निधींची गरज आहे. कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 55 कोटी 37 लाखांची आवश्‍यकता आहे. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी चार कोटी 72 लाखांची गरज असल्याचे बांधकाम विभागाने प्रस्तावात नमूद केले आहे. हा प्रस्ताव 26 ऑगस्टला ग्रामविकास खात्याकडे पाठविला आहे. नरखेड व सावनेर तालुक्‍यात एकही रस्ता पावसामुळे खराब झाला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? 263 km of roads in the district damaged due to heavy rainfall