शिक्षकदिन आठवड्यावर! यंदा राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला?

रुपेश खैरी
Friday, 28 August 2020

राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) राज्यातील गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा शिक्षकदिन अवघा आठवड्यावर येऊन ठेपला तरी शासनाकडून अद्याप राज्यातील शिक्षकांकडून प्रस्तावच मागवले गेले नसल्याने यंदा शासनाला आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर तर पडला नाही ना ? अशी प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करीत आहेत.

नंदोरी (जि. वर्धा) : कोरोनाच्या प्रभावाने सारे व्यवहारच थंडावले आहेत. शिक्षण क्षेत्रावर तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. शाळा, परीक्षा हे सगळेच सध्या थंड बस्त्यात आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी घोषित होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारावरही यंदा मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण शिक्षक दिन आढवड्यावर येऊन ठेपला असूनही अजूनही शिक्षकांकडून प्रस्ताव मागविम्यात आलेले नाहीत.

राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) राज्यातील गुणवंत शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा शिक्षकदिन अवघा आठवड्यावर येऊन ठेपला तरी शासनाकडून अद्याप राज्यातील शिक्षकांकडून प्रस्तावच मागवले गेले नसल्याने यंदा शासनाला आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर तर पडला नाही ना ? अशी प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करीत आहेत.

क्लिक करा - आयुक्त मुंढेच्या बदलीसाठी कोणी केला समझोता?, वाचा सविस्तर

दरवर्षी शिक्षक पुरस्काराच्या प्रक्रियेला जुलै महिन्यातच प्रारंभ होतो. मुलाखती घेतल्या जातात. यंदा मात्र या प्रक्रियेला अद्याप सुरुवातच झाली नसल्याने राज्यातील शिक्षकांत नाराजीचे वातावरण आहे. जिल्हा राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक पुरस्कारासाठी प्रक्रियेस प्रारंभही झाला असला तरी राज्यस्तरीय पुरस्काराविषयी अद्याप अनिश्‍चितता आहे. अजून याबाबतची कुठलीही माहिती न आल्याने राज्यातील शिक्षकांत नाराजी पसरली आहे. सध्या राज्य कोरोनाच्या गर्तेत सापडले असल्याने सरकारला शिक्षकांचे कौतुक करण्याचा विसर तर पडला नाही ना? अशी राज्यातील शिक्षकांमध्ये चर्चा आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What about Aadarsh shikshak purskar?