दारूबंदीचे काय? दारूतस्करीत चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

घुग्घुस (जि. चंद्रपूर)  : वर्धा नदीच्या पुलाजवळ असलेल्या नकोडा गावात नाकाबंदी करून पोलिसांनी दारूची वाहतूक करताना चौघांना अटक केली. घुग्घुस पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी (ता. 3) केली.

घुग्घुस (जि. चंद्रपूर)  : वर्धा नदीच्या पुलाजवळ असलेल्या नकोडा गावात नाकाबंदी करून पोलिसांनी दारूची वाहतूक करताना चौघांना अटक केली. घुग्घुस पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी (ता. 3) केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सीमेलगत चौकी उभारली आहे. येथे वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एमएच 34 ए. वाय. 5337 या क्रमाकांच्या वाहनाने दारू आणण्यात येत होती. नकोडा गावाजवळ पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली. तपासणीत या वाहनात देशी दारूचा साठा आढळला. याप्रकरणी पोलिसांनी आकाश चंद्रप्रकाश वाघाडे (वय 28), प्रकाश जीवनदास गोहणे (वय 36 रा. धोपटाळा) यांना अटक केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दारूची किमत 4 हजार 800 रुपये आहे. एकूण मुद्देमालाची किमत 54 हजार 800 रुपये आहे. दुसऱ्या कारवाईत सय्यद इरफान सय्यद ताज (वय 35), शेख जावेद अब्दुल खलील (वय 38 रा. वणी) यांना अटक करण्यात आली. दोघेही एम एच 40 टी 2810 या क्रमांकाच्या दुचाकीने देशी दारू आणत होते. त्यांनाही नकोडा गावाजवळ अटक करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What about alcohol? Four liquor smuggler arrested