esakal | हे काय? अश्‍लील फोटोद्वारे विवाहितेला केले ब्लॅकमेल
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

हे काय? अश्‍लील फोटोद्वारे विवाहितेला केले ब्लॅकमेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सोशल मीडियावरून झालेली ओळख व सुरू झालेल्या प्रेमप्रकरणात विवाहिता एवढी आंधळी झाली की, त्याने जसे अश्‍लील फोटो पाठवायला लावले; तसे फोटो तिने पाठविले. त्यानंतर युवकाने तिला ब्लॅकमेल केले. पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी सचिन संतोष गायकवाड (रा. बुलडाणा) याच्या विरुद्ध फसवणूक, आय. टी. ऍक्‍टअन्वये गुन्हा दाखल केला. साडेतीन महिन्यात विवाहितेच्या प्रेमाचा असा शेवट झाला. 1 जून 2019 पासून व्हॉट्‌सऍपवरून विवाहितेची युवकासोबत चर्चा सुरू झाली. संपर्क करणाऱ्याने स्वत:चे नाव, पदांबाबत महिलेला खोटी माहिती दिली. ज्याची कधी भेटच झाली नाही. त्याच्यावर तिने विश्‍वास टाकला. विश्‍वास संपादन करताच, ती प्रेमात पडली. सोशल मीडियावरून चॅटिंगनंतर युवकाने विवाहित प्रेयसीला स्वत:चे आकर्षक फोटो पाठविले. त्यानंतर तिच्याकडून फोटो मागितले. तिनेही व्हॉट्‌सऍपवर फोटो पाठविले. विवाहिता जाळ्यात ओढली जात असल्याचे बघून, त्याने तिला अश्‍लील फोटोची मागणी केली. तिनेही कशाचाही विचार न करता, तसेच फोटो पाठविले. अश्‍लील फोटो मिळताच, सचिनने तिला पैशाची मागणी केली. तिने फोन पे-वरून 2 हजार रुपये व त्यानंतर त्याच्या बॅंक खात्यावर 2 हजार 300 अशी रक्कम पाठवली. खाते मिळताच पीडितेच्या पतीने पत्नीला ब्लॅकमेल करणाऱ्याची माहिती मिळवली. त्याच्या वडिलांसोबत संपर्क साधून माहिती दिली. पीडितेने सचिन संतोष गायकवाडविरुद्ध ठाण्यात तक्रार केली.
पतीने वॉच ठेवल्याने भंडाफोड
पत्नी अडीच ते तीन महिन्यांपासून ज्या युवकासोबत सोशल मीडियावरून चॅटिंग करीत होती. तिला प्रत्यक्ष चॅटिंग करताना पतीनेच रंगेहाथ पकडले. त्यानंतर या घटनेचा भंडाफोड झाला.
फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्याची बारकाईने चौकशी केली जाईल. त्यासाठी सचिन गायकवाडला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
- पंजाब वंजारी,
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.

loading image
go to top