काय? पुरात पूल गेला वाहून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

कामठी (जि. नागपूर) : पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या कामठी तालुक्‍यातील धारगाव ते नागपूर-जबलपूर बायपासला चारपदरी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल निकृष्ट कामामुळे तीन महिन्यांपूर्वी कोसळला असला, तरी त्या पुलाचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात न आल्याने धारगाव गावातील नागरिकांसह या मार्गाने नेहमी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

या चारपदरी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल निकृष्ट कामामुळे तीन महिन्यांपूर्वी कोसळला. मुसळधार पाऊस आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यापुढे निकृष्ट दर्जाचे या पुलाचे बांधकाम टिकू शकले नाही. पूर्वीपासूनच हे बांधकाम निकृष्ट असल्याची ओरड होती. शेवटी त्यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे गावातील नागरिकांनी त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची आणि निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. 
कामठी-घोरपड-धारगाव ते नागपूर-जबलपूर बायपास चारपदरी महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. गेल्या वर्षी या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले. आता पूल कोसळल्यामुळे स्थानिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या मार्गावरून कामठीहून नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या धारगाव गावातील नागरिकांचे या पुलाच्या पलीकडेच शेती आहे. या सर्वांनासुद्धा गावाच्या पलीकडून 4 किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. काही लोक मात्र एवढा फेरा मारू न शकल्याने ते याच कोसळलेल्या पुलामधून जीव धोक्‍यात घालून पलीकडे जात असल्याचे चित्र दिसून आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? The bridge is gone