काय! दिव्यांग विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काची वसुली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभारात बाबूगिरीचा वरचष्मा असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ असता नियम धाब्यावर टाकून परीक्षा शुल्काची वसुली केली जात असल्याचे पुढे आले आहे. वरचढ बाबूंना आवर घालणे सोडाच त्याच्यासमोर प्रशासनेही लोटांगण घातल्याचे चित्र आहे. 

राज्य सरकारच्या नियमानुसार दिव्यांग विद्यार्थ्याला परीक्षा शुल्कात सूट आहे. अनेक वर्षांपासून नागपूर विद्यापीठ ही सवलत देत आहे. परंतु, राज्यशास्त्र विभागात हिवाळी परीक्षांचे अर्ज भरणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांकडून शुल्काची वसुली करण्यात आली. परीक्षा द्यायची असल्याने शुल्क भरण्यावाचून पर्याय नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. पर्याय नसल्याने काही विद्यार्थ्यांनी वित्त विभागात जाऊन 539 रुपयांचा भरणा केला. त्यानंतरच विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. 
काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी नियमाचा दाखला देत परीक्षा शुल्क भरण्यास नकार दिला. यामुळे त्यांचे अर्ज थांबवून ठेवले. भवितव्याचा प्रश्‍न असल्याने विद्यार्थी याविरोधात उघडपणे समोर यायला घाबरत आहेत. या प्रकाराची तक्रार विभागप्रमुखांकडेही करण्यात आली. परंतु, त्यांनीही दुर्लक्ष केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What! Examination fee is collected from the handicapped students