काय? महामेट्रो नव्हे, मनपा बांधणार मेट्रो मॉल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशननजीक बांधण्यात येणाऱ्या मेट्रो मॉलची पुढील कामे आता महामेट्रोऐवजी महापालिका करणार आहे. मेट्रो मॉलचे काम महामेट्रो संथगतीने करीत असल्याचा ठपका महापालिकेच्या प्रकल्प विभागाने ठेवला असून, स्थायी समितीने महामेट्रो व महापालिकेतील याबाबतचा करार मोडीत काढून नवा करार करण्याचे अधिकार आयुक्तांना दिले.

ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प महापालिका राबविणार आहे. मात्र, जयप्रकाशनगर येथील मेट्रो स्टेशननजीक मेट्रो मॉलचे काम करण्याची जबाबदारी महापालिकेने महामेट्रोवर सोपविली होती. याबाबत महापालिका व महामेट्रोमध्ये करारही झाला. 53 कोटींच्या या मॉलसाठी जानेवारीमध्ये महापालिकेने महामेट्रोला 11 कोटी दिले. मात्र, प्रकल्प समितीच्या अनेक बैठकीत महामेट्रो संथगतीने काम करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे महामेट्रोकडून काम काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव प्रकल्प विभागाने तयार करून शुक्रवारी स्थायी समितीपुढे मांडला.
महामेट्रोने मॉलचा पाया रचला. मात्र, हे काम संथगतीने होत असल्याने पुढील कामे महापालिका करणार असून, याबाबत निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. महामेट्रोसोबत केलेल्या करारानुसार केवळ पायापर्यंतचे काम करून घेण्यात येणार आहे. यापुढील कामे महापालिका करणार आहे. महामेट्रोसोबतचा करार मोडीत काढून नव्याने करारात सुधारणा करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यासंबंधाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला. मेट्रो मॉलमधील गाळे नोंदणीतून येणाऱ्या रकमेतून मॉलचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What? Metro mall to be built by Municipal Corporation, not Mahamatro