esakal | काय? गणेशमूर्ती बसविण्यावरून जरीपटक्‍यात तणाव
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

काय? गणेशमूर्ती बसविण्यावरून जरीपटक्‍यात तणाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जरीपटका येथील चौधरी चौकात आपत्तीजनक गणेशमूर्ती बसविल्याने बजरंग दल व गणेश मंडळांचे कार्यकर्ते आमनेसामने झाले. बजरंग दलाने मूर्तीवर आक्षेप घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव मंडळ आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्याने तणाव निवळला.
रुद्र गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी गणपतीची स्थापना करण्यात आली. आपत्तीजनक गणेशमूर्ती बसविण्यात येणार असल्याची कुणकूण लागल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर पदाधिकाऱ्यांनी आपत्तीजनक मूर्ती बसविण्यात येणार नाही, असे आश्‍वासन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आश्‍वासन न पाळता थाटामाटात मूर्तीची स्थापना केली. त्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते संतप्त झाले. जरीपटका पोलिसांना ही माहिती समजताच घटनास्थळी गेले. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आपत्तीजनक गणपती बसविल्याची तक्रार पोलिसात केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यात बैठक घेण्यात आली. बैठकीत आपत्तीजनक मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार नाही. त्यावर पूर्णपणे कापड झाकण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तणाव निवळला. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपत्तीजनक मूर्तीला बाजूला करून दुसरी मूर्ती बसविली.

loading image
go to top