कंगना प्रकरणी काय म्हणाल्या संतापलेल्या नवनीत राणा?

सुरेंद्र चापोरकर
Wednesday, 9 September 2020

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई महापालिकेने  नोटीस बजावली होती.
पाली हिल येथील कार्यालयात कंगनाने नियमबाह्य बांधकाम केल्याप्रकरणी तिला नोटीस बजावण्यात आली होती.

अमरावती : सध्या कंगना प्रकरण चांगलेच गाजते आहे. सत्तापक्ष नेते आणि कंगना यांच्यात दररोज कलगीतुरा रंगतो आहे. केंद्र सरकारने कंगनाला वाय सुरक्षा दिली आणि हे युद्ध कंगना विरुद्ध शिवसेना असे न उरता केंद्र विरुद्ध राज्य असे झाले. त्यातच शिवसेनेची सत्ता असलेल्या बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील घर-कार्यालयावर कारवाई केली आणि सगळ्यांची सहानुभुती कंगनाला मिळाली.

चित्रपट अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतापल्या असून, सत्तेच्या मोहात सरकार ताकदीचा दुरुपयोग करीत असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे व ही हुकूमशाही चांगली नाही, असे नवनीत राणा यांनी ट्विट केले आहे.

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई महापालिकेने  नोटीस बजावली होती.
पाली हिल येथील कार्यालयात कंगनाने नियमबाह्य बांधकाम केल्याप्रकरणी तिला नोटीस बजावण्यात आली होती.

सविस्तर वाचा - काय सांगता! यासाठी चक्क शिक्षकांनी घातले लोटांगण; अध्यक्ष, उपाध्यक्षांकडे वाढल्या चकरा; कारण काय?

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी कंगनाने सातत्याने शिवसेना व पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. तिची टीका जिव्हारी लागल्याने शिवसेनेचे नेते चांगलेच संतापले होते. त्यातूनच कंगनाला नोटीस देण्यात आली व आजच तिच्या कार्यालयावर कारवाईसुद्धा करण्यात आल्याचे बोलले जाते.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a twit of Navneet Rana about Kangana?