कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

एकांतासाठी अनेक साधू हे गुहे मध्ये राहतात. तसेच कुंभ मेळा संपल्यानंतर अनेक साधू हे जंगलात भटकत असतात. जंगलात त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. त्यांचे मन आणि शरीर तेवढे कणखर बनले असते. तिथे सर्व गोष्टीवर मात करू शकतात, असे सांगण्यात येते.

 कुंभमेळा भारतीयांसाठी उत्सवाप्रमाणेच असतो. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात. गेल्या काही वर्षापासून कुंभमेळ्यात दाखल होण्यासाठी परदेशातून साधू व भाविक देखील येत असतात.  नागा साधू अर्धकुंभ, महाकुंभ येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र, कुंभमेळा संपल्यानंतर ते नेमके काय करतात, कुठे जातात, काय खातात याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
नागा साधू होण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. यासाठी आधी नागा आखाडा येथे जावे लागते. आखाडा ज्याला नागा साधू व्हायचे त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती घेतात. त्यानंतर त्याची प्राथमिक परीक्षा घेण्यात येते. आखाडामधील साधूंना जर वाटले की हा व्यक्ती नागा साधू होऊ शकतो, तरच त्याला पुढील परीक्षेसाठी पाठविले जाते. यामध्ये ब्रह्मचर्य, वैराग, धर्म आणि इतरांची दीक्षा देण्यात येते. त्यानंतरच त्याला पुढे पाठवण्यात येते. दिक्षा घेण्याचा कालावधी हा एक वर्ष ते बारा वर्षांपर्यंत असू शकतो.

दुसऱ्या क्रियेत नागा साधू यांचे मुंडन करण्यात येते. त्यानंतर त्यांच्याकडून पिंडदान देखील करुन घेण्यात येते. पिंडदान म्हणजे आपल्या सर्व नातेवाईकांवर पाणी सोडणे होय. त्यानंतर स्वतःचे देखील श्राद्ध करायचे. नागा साधुंच्या अंगाला भस्म लावलेले असते. हे भस्म चितेचे असते. चितेची ही राख शुद्ध करून नागा साधू ती आपल्या अंगाला लावत असतात. आजवर अनेकांना प्रश्न पडतो की, नागा साधू हे कुंभ मेळ्यानंतर कोठे जातात, कोठे राहतात, तर नागा साधू हे कुंभमेळा झाल्यानंतर हिमालय, काशी आणि गुजरात राज्यात राहत असल्याचे पाहायला मिळते. तसेच उत्तराखंडच्या पहाडी भागात देखील ते राहतात.

एकांतासाठी अनेक साधू हे गुहे मध्ये राहतात. तसेच कुंभ मेळा संपल्यानंतर अनेक साधू हे जंगलात भटकत असतात. जंगलात त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. त्यांचे मन आणि शरीर तेवढे कणखर बनले असते. तिथे सर्व गोष्टीवर मात करू शकतात, असे सांगण्यात येते.

नागा साधू हे दिवसातून केवळ एकच वेळेस जेवण करतात. एकच वेळेस जेवण म्हणजे पोटभर खाऊन घ्यायचं. नंतर दिवसभर काहीही नाही खायचे. नागा साधूचे जीवन एकूणच रहस्यमय घटनांनी भरलेले आहे. यावर अनेकांनी डॉक्युमेंटरी देखील तयार केलेल्या आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where are Naga Sadhu stay